• प. पू. स्वामी
    • चरित्र
    • शिकवण
    • प्रमुख शिष्य
    • गुरुपरंपरा
  • समाधी मंदिर
    • परिसर आणि माहिती
  • संस्थेविषयी
    • परिचय
    • व्यवस्थापन
    • सेवा कार्य
  • प्रकाशन
  • गॅलरी
  • देणगी
    • ऑनलाईन
    • ऑफलाईन
  • संपर्क
  • ई-पूजा
  • भाषा
    • मराठी
    • इंग्लिश
प्रकाशन > पुस्तके

श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी

- स्वामी स्वरूपानंद

श्रीज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली प्राकृत मराठी भाषेतील ज्ञानेश्वरी ९००० (नऊ हजार ) ओव्यांची आहे. परंतु प्राकृत मराठी भाषा आता समजण्यास कठीण आहे. त्यासाठी श्रीमत् स्वामीजींनी ह्या ओव्यांचे सोप्या व  प्रचलित मराठीत १६००० (सोळा हजार) ओव्या केल्या आहेत. ह्या ओव्या वाचल्यावर मूळ ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा अर्थ सहजच कळतो. ह्या ग्रंथाचे सप्ताह पारायण करता येते. पारायणाची उपासना करणाऱ्यास प.पू.स्वामीजींच्या  कृपेचा प्रसाद लाभतो.  ह्या ग्रंथास  रुपये  २००/- पर्यत खर्च होतो.परंतु भक्तांच्या  सोयीसाठी ग्रंथाची किंमत पावस येथे फक्त रुपये ६०/- ठेवली आहे. इतरत्र  मूल्य १०० /- रु. आहे.

रु. ६०.०० प्रकाशन दिनांक : 12 May 2025

श्रीमत् भावार्थ गीता

- स्वामी स्वरूपानंद

श्रीमत् भगवतगीतेचा ७०० संस्कृत श्लोकांचा साकी छंदात केलेला मराठी अनुवाद म्हणजेच भावार्थ गीता. ह्यात १६१९ साक्यां आहेत. पठण करण्यासाठी आणि अर्थ कळण्यासाठी  अतिशय सोप्या आहेत.

रु. ३५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

स्वरूप ज्ञानेश्वरी

- स्वामी स्वरूपानंद

श्रीस्वामीजींचे सद्गुरू श्रीबाबामहाराज वैद्य ज्ञानेश्वरी ग्रंथाची हस्तलिखित प्रत वाचीत असत. त्यांच्या नित्य वाचनाची प्रत जीर्ण झालेली होती.हे  पाहून श्रीमत् स्वामीजींनी आपल्या स्वहस्ते सुवाच्य अक्षरात ज्ञानेश्वरी ग्रंथाची  प्रत तयार करून ती आपल्या सद्गुरुना मनोभावे अर्पण केली. त्याच प्रतीची ही फोटो कॉपी . मूळ हस्तलिखित प्रत कोल्हापूर येथील स्वामीभक्त श्री.शांतारामबापू जामसंडेकर ह्यांचे घरी आहे.  
रु. १२०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

श्रीमत् संजीवनी गाथा

- स्वामी स्वरूपानंद

प.पू.स्वामीजींनी  रचलेले हे एकूण २६१ अभंग आहेत. हे अभंग वाचताना व गाताना आपले मन भक्ती भावाने भरून येते. शिवाय नाउमेद झालेल्या मनाला नवीन चैतन्यदायी प्रेरणा लाभते.  निराश मनाला ज्या श्रद्धेचा आधार लाभावा अशी इच्छा असते तो आधार पू.स्वामीजींची ह्या पुस्तकातील अभंग देतात.  

रु. २५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

स्वरूप-पत्र-मंजूषा

- स्वामी स्वरूपानंद

श्रीमत् स्वामीजींनी आपल्या भक्तांना पाठविलेल्या पद्यमय पत्रांचा हा संग्रह आहे. त्यातून भक्तांना केलेले अध्यामिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन सर्वांच्या उपयोगाचे आहे.   
रु. ३५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ

- स्वामी स्वरूपानंद

श्रीज्ञानेश्वरी ग्रंथातील श्रीमत स्वामीजींनी संपादित केलेल्या  निवडक १०९ ( एकशे  नऊ) ओव्यांची ही छोटी पुस्तिका आहे. ह्यात श्रीज्ञानेश्वरीचे सार आहे.  नित्यवाचना करिता अत्यंत उपयुक्त आहे. 

रु. २/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

अभंग अमृतानुभव

- स्वामी स्वरूपानंद

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभव या ग्रंथाचा श्रीस्वामीजींनी केलेला अभंगातील अनुवाद. या ग्रंथात भगवंताच्या सगुण-निर्गुण दर्शन-साक्षात्कारानंतर येणाऱ्या अनुभवाचे वर्णन आहे. सोप्या, सुलभ मराठी भाषेतील अभंगातून ते आपणास वाचावयास मिळेल.  

रु. ३० /- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

श्री चांगदेव पासष्टी

- स्वामी स्वरूपानंद

श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ६५ (पासष्ट) ओव्यांत श्रीचांगदेवांना केलेला उपदेश. त्याचा श्रीमत् स्वामीजींनी १३३ ओव्यात केलेला हा सुलभ अनुवाद आहे. चमत्कार करणाऱ्या सिद्धीच्या मोहजालात अडकलेल्या साधक सिद्धांसाठी आत्मबोधाचे महत्व सांगणारा हा उपदेश आहे. 
रु. २ /- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

अमृतधारा

- स्वामी स्वरूपानंद

प.पू.स्वामीजींच्या अध्यात्मिक अनुभवांनी भरलेल्या अशा १६२ साक्या असलेले हे दिव्य अमृत आहे. सन १९३५ साली सुमारे सहा महिन्यांच्या काळात श्रीमत् स्वामीजींना स्फुरलेल्या ह्या काव्यात विविध भाव व्यक्त झालेले आहेत.  

रु. २५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

सचित्र पावस दर्शन

- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ

पावस बद्दलची सविस्तर माहिती या पुस्तकात मिळते. समाधी मंदिर परिसर तसेच पावस मधील अन्य स्थळांबद्दल फोटोसहित माहिती दिलेली आहे.  
रु. २५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

सोऽहं भजन

- अशोकानंद रेळेकर

श्रीमत् स्वामी स्वरूपानंदजी ह्यांनी अनुग्रहीतांना सांगितलेल्या नाथ संप्रदायाच्या सोऽहं साधनेची अचूक माहिती सांगणारे हे पुस्तक. या साधनेस श्रीमत् स्वामीजी सोऽहं भजन असे म्हणत असत. सोऽहं साधकांना उत्तम प्रकारचे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक श्रीमत् स्वामीजींनी जशी सांगितली तशीच सोऽहं साधनेची पद्धत ह्या पुस्तकात दिलेली आहे.  

ह्या साधनेतील प्रक्रिया, अनुग्रह इत्यादी बाबत अधिक माहितीसाठी ह्या पुस्तकाचे संपादक पावस येथील श्री. अशोकानंद रेळेकर ह्यांना त्यांच्या सोयी सवडीनुसार (चौकशी करून) समक्ष भेटता येईल.

रु. ३०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

श्रीसिद्धचरित्र

- श्रीपतिनाथ

श्रीमत् स्वामीस्वरूपानंदजींच्या गुरुपरंपरेतील दहा सिद्ध पुरुषांची अद्भूत चरित्रे सांगणारा हा ओवीबद्ध ग्रंथ आहे. अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण ओव्यातून ह्या सिद्धांची अलौकीकचरित्रे ह्यात वर्णन केलेली आहेत. हा ग्रंथ इ.स.१८८३ चे सुमारास श्रीरामचंद्र महाराज तिकोटेकर ह्यांनी त्यांचे शिष्य श्रीपतिनाथ ( कोल्हापूर ) ह्यांचे कडून करवून घेतला.त्यासाठी श्रीरामचंद्र महाराज तिकोटेकर ह्यांच्या कन्या व शिष्या गोदामाई कीर्तने उर्फ योगिनी गुंडाक्का ह्यांचे मार्गदर्शन लाभले.ह्या ग्रंथाची भावभक्तीने पारायणे करणारास योग्यती अध्यात्मिक अनुभूती येते.

रु. १२५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी स्वरूप आणि आस्वाद

- संपादक- डॉ. ब. ना. तुरंबेकर

श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी ह्या श्रीस्वामीजी लिखित ग्रंथातील तत्वज्ञानाचे विविध दृष्टीने परीक्षण करणारे मान्यवर लेखकांचे लेख ह्या ग्रंथात आहेत. अभ्यासू व जिज्ञासू वाचकांसाठी ते फारच उपयुक्त ठरणार आहेत. ह्या लेखातून श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरीचे महत्त्व आणि आवश्यकता लक्षात येते.  

रु. ६०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

अनंत आठवणीतील अनंत निवास

- संपादक- प्रा. अशोक देशमुख, डॉ. ब. ना. तुरंबेकर

स्वामीभक्त श्री. देसाई ह्यांच्या पावस येथील अनंतनिवास ह्या वास्तूतील श्रीमत् स्वामीजींच्या अनुग्रहित भक्तांच्या, साधकांच्या श्रीस्वामीजींच्या  रम्य आठवणी व त्यांना आलेले विशेष अनुभव सांगणारे लेख ह्यापुस्तकात आहेत.  
रु. ६०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

आत्मप्रभा

- द. ल. निरोखेकर

नाशिक येथील ब्रह्मीभूत  गजानन महाराज गुप्ते ह्यांची प्रवचने संकलित केलेले हे पुस्तक आहे. गुप्ते महाराज नाथ संप्रदायी होते. त्यामुळे सोऽहं साधनेतील त्यांनी केलेले मार्गदर्शन ह्या प्रवचनातून आढळते. अत्यंत सोप्या भाषेतून केलेली, श्रोत्याशी संवाद करणारी ही प्रवचने अत्यंत प्रभावी आहेत.
रु. ३५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान

- डॉ.रा. य. परांजपे

श्रीमत् स्वामीजींचे हे विस्तृत चरित्र आहे. डॉ. रा. य. परांजपे ह्यांनी प.पू.स्वामीजींच्या मार्गदर्शना प्रमाणे लिहिलेले हे चरित्र सुमारे ६५० पृष्ठांचे आहे.
रु. ६०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

पावसचा प्रेमदीप

- स्वामी सत्यदेवानंद सरस्वती

स्वामी सत्यदेवानंद सरस्वती ह्यांनी लिहिलेले हे पुस्तक श्रीमत् स्वामी स्वरूपानंदजींचे संक्षिप्त चरित्र  असून त्याची भाषा ओघवती व रसाळ आहे.  

रु. ३०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

प.पू. स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन

- संपादक डॉ. अशोक कामत, प्रा. म. अ. कुलकर्णी

श्रीमत् स्वामीजींच्या जीवन चरित्रा बरोबरच त्यांच्या साहित्याचे परीक्षण हे पुस्तक सुप्रसिद्ध संत साहित्य संशोधक डॉ. अशोक कामत आणिप्रा. म. अ. कुलकर्णी( स्वामी प्रज्ञानंद ) ह्यांनी संपादन केलेले आहे. विविध प्रतिथयश लेखकांनी श्रीमत् स्वामीजींच्या चरित्राबद्दल व साहित्याबद्दल लिहिलेल्या समृद्धलेखांनी हे पुस्तक संपन्न झाले आहे. अभ्यासू व जिज्ञासूंसाठी हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.  
रु. १५०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

द परमहंस ऑफ पावस स्वामी स्वरूपानंद

- डी.के.पांडे (स्वामी विद्यानंद)

श्री. डी.के.पांडे तथा स्वामी विद्यानंद ह्यांनी लिहिलेले प.पू.स्वामीजींचे  इंग्रजी चरित्र.

रु. १२५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

संक्षिप्त अभंग ज्ञानेश्वरी

- स्वामी स्वरूपानंद

स्वामींनी रचलेल्या अभंग ज्ञानेश्वरीचे संक्षिप्त रूप 

रु. १५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

तीन प्रवचने

- स्वामी स्वरूपानंद

प.पू..स्वामीजींनी सांगितलेल्या प्रवचनाचे पुस्तक
 
रु. ५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

वरप्रार्थना व नवरत्नहार

- स्वामी स्वरूपानंद

स्वामींनी गुरु गणेशनाथ यांना अर्पण केलेला नवरत्नहार व वरप्रार्थना 
रु. २०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

संक्षिप्त संजीवनी गाथा

- स्वामी स्वरूपानंद

स्वामींनी रचलेल्या संजीवनी गाथेतील निवडक अभंग
रु. २/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

गीता तत्त्वसार

- स्वामी स्वरूपानंद

भगवदगीतेतील तत्त्वाचे सार 
रु. ५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

एकाध्यायी चरित्रामृत

- स्वामी सत्यदेवानंद सरस्वती

प.पू.स्वामीजींचे ओवीबद्ध एकाध्यायी चरित्र 

रु. १५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

अठरा श्लोकी गीता

- स्वामी स्वरूपानंद (अनुवादक-श्रीमती मृणालिनी जोशी)

भगवदगीतेतील अठरा  श्लोक व त्यांचे स्पष्टीकरण 
रु. ३०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

हिंदी चरित्र

- गो.रा.कुलकर्णी

प.पू.स्वामींचे हिंदीतील चरित्र
रु. २५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

इंग्रजी चरित्र

- माधव रानडे

प.पू.स्वामींचे इंग्रजीतील संक्षिप्त चरित्र 
रु. ५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

स्वामी म्हणे अमलानंदा

- वसंत दामोदर भट

स्वामींनी त्यांचे शिष्य अमलानंद यांना वेळोवेळो जो उपदेश दिला त्याचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. 
रु. ६०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

स्वामी स्वरूपानंद - एक अलौकिक राजयोगी

- महादेव दामोदर भट

स्वामींचे एक शिष्य श्री. म. दा. भट यांनी त्यांना आलेल्या स्वामींच्या अनुभवांचे कथन या पुस्तकातून केले आहे. 
रु. ८०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

अभंग ज्ञानेश्वरी सार स्तोत्र

- स्वामी स्वरूपानंद

स्वामींनी रचलेल्या अभंग ज्ञानेश्वरीचे सार.
रु. ५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

स्वामी कृपांकित कर्मयोगी भाऊ

- संपादक - डॉ. ब. ना. तुरंबेकर

.पू.स्वामीजींचे अंतरंग शिष्य भाऊराव देसाई यांच्या जन्मशताब्दी निमित्त हा संपादित केलेला  गौरवग्रंथ आहे.त्यात स्वामीजींच्या अनेक भक्तांनी आपले अनुभव लिहिलेले आहेत.
रु. ५०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

सोऽहं साधना - पंथराज

- महादेव दामोदर भट

नाथसंप्रदायी सोsहं -साधनेचा मार्ग, ध्येय व स्वरूप या विषयी माहिती.

रु. ८०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

अमृतसिद्धी

- श्रीमती मृणालिनी जोशी

प.पू..स्वामीजींचे जीवनावरील कादंबरी स्वरूपातील चरित्र 

रु. ६०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

सोsहं भजन - साधना आणि सिद्धी

- श्री.अशोकानंद रेळेकर

श्रीमत् स्वामी स्वरूपानंदजी ह्यांनी अनुग्रहीतांना सांगितलेल्या नाथ संप्रदायाच्या सोऽहं साधनेची अचूक माहिती सांगणारे हे पुस्तक.

रु. ३०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ-अभ्यास

- स्वामी सेवक

श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ओव्यांचे विवेचन 

रु. २०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

स्मृती सौरभ

- संपादक-स्वामी सत्यदेवानंद सरस्वती,श्रीम.मृणालिनी जोशी, श्री.ना.स.करंदीकर

प.पू.स्वामी स्वरूपानंद यांच्या भक्तांच्या आठवणी ह्या पुस्तकात संग्रहित केल्या आहेत.

रु. ५०/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

आत्मप्रभा बोध-गुटिका

- संकलन- स्वामी सत्यदेवानंद सरस्वती

आत्मप्रभा या पुस्तकात श्री गजानन महाराज गुप्ते ह्यांनी सोsहं साधने विषयी विस्तृत निरुपण केले आहे. आत्मप्रभा बोध-गुटिका मधील सर्व मजकूर श्री गजानन महाराजांचाच आहे. श्री महाराजांच्या सोsहं अमृतौषधीच्या ह्या एकूण शंभर बोध-गुटिका आहेत.

रु. २/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

स्वामी स्वरूपानंद संक्षिप्त चरित्र

- मुक्ता

स्वामी स्वरूपानंद यांचे गोष्टीरूप चरित्र शालेय मुलांना समोर ठेऊन त्यांना आवडेल व समजेल अश्या सोप्या शब्दात लिहिले आहे.

रु. ५/- प्रकाशन दिनांक : 12 May 2025

आजची पूजा


प्रातः समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :


सायं समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस
(जि. रत्नागिरी)
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था
नोंदणी क्र.प. ट्र. एफ -११२ (रत्नागिरी)
मु. पो. पावस, ता. जि. रत्नागिरी - ४१५ ६१६ महाराष्ट्र

www.swamiswaroopanandpawas.in

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पांवस या सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ